पादत्राणाचे डिझाइन थक्क करणारे
युरोपचे सर्वात जुने बेट एका 6 हजार वर्षांपेक्षा अधिक जुन्या गुहेत आढळून आले आहेत. ही एक स्पॅनिक गुहा असून यात वटवाघळांचा अधिवास आहे. अनेक वर्षांनंतरही या गुहेत आढळून आलेले बूट अत्यंत उत्तम स्थितीत आहेत. या बूटचे डिझाइन थक्क करून टाकणारे आहे. वैज्ञानिक देखील या बूट्सना पाहून चकित झाले आहेत. हा शोध नवपाषाणकालीन माणसांचे अद्भूत कौशल्य आणि कलाकुसर दर्शविणारा आहे. हे बूट जटिल स्वरुपात विणण्यात आलेल्या लाकडी कलाकृतींसोबत आढळून आले आहेत. वैज्ञानिकांच्या एका पथकाने या प्रीहिस्टोरिक प्लिमसोल्सची तपासणी केल्यावर सर्वात जुना बूट एस्पार्टो गवताच्या रेशोंद्वारे विणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक एस्पॅड्रिल बूटसोबत याची बऱ्याचअंशी समानता आहे. तसेच हा बूट 2005 मध्ये आर्मेनियात सापडलेल्या 5500 वर्षे जुन्या बूटपेक्षा अधिक जुना ठरला आहे. गुहेत सापडलेल्या अन्य वस्तुंमध्ये टोपलींचा एक सेट तसेच साधारण लाकडी उपकरण सामील आहे. 76 वस्तूंपैकी काहींची निर्मिती 9500 वर्षांपूर्वी झाली होती. यामुळे हे प्रारंभिक शिकारी-संग्रहकर्ता समाजांदरम्यान टोपली विणण्याचा पहिले पुरावे ठरल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.









