टीडीपीला पाठिंबा देण्याची जनसेना पक्षाची घोषणा
वृत्तसंस्था /हैदराबाद
अभिनेता आणि नेते पवन कल्याण यांनी गुऊवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडण्याची आणि टीडीपीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. आंध्रप्रदेशचा विकास होण्यासाठी जनसेना आणि टीडीपीची गरज असल्याचे पवन कल्याण यांच्याकडून सांगण्यात आले. ‘आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी एक मजबूत पक्ष असून राज्यात सुशासन आणि विकासासाठी तेलुगू देसम पक्षाची गरज आहे. आज टीडीपी संघर्ष करत असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या स्थितीत टीडीपीला जनसैनिकांच्या तऊणांची गरज आहे. टीडीपी आणि जनसेना एकत्र आल्यास राज्यातील वायएसआरसीपी सरकार तरणार नाही’, असा दावा जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी केला आहे.
पवन कल्याण यांनी आपला पक्ष एनडीए आणि टीडीपी यांना आंध्रप्रदेशातील वायएसआरसीपी सरकारविरोधात लढण्यासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता त्यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण हे आंध्रप्रदेशच्या वायएसआर जगनमोहन रे•ाr सरकारवर नाराज आहेत. जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण 14 सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडूंना भेटण्यासाठी राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात गेले होते. यानंतर 18 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. या बैठकीत पवन कल्याण यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते. रालोआच्या घटकपक्षांच्या बैठकीत आत्मनिर्भर भारतावर चर्चा झाली. माझ्या पक्षाच्या वतीने मी पंतप्रधानांना वचन दिले आहे की आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता त्यांनी एनडीएऐवजी टीडीपीला साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पवन कल्याणच्या जनसेना पक्षाने 5.6 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकली, तर टीडीपीने 39.7 टक्के मतांसह 23 जागा जिंकल्या. तर ‘वायएसआरसीपी’ने 50.6 मतांसह 151 जागा जिंकल्या होत्या.









