दोडामार्ग – वार्ताहर
यंदाच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ दोडामार्गची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नितीन मणेरीकर तर सचिव पदी आनंद कामत यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रमोद परमेकर व खजिनदारपदी विशाल मणेरीकर यांचीही निवड करण्यात आली आहे.
येथील बाजारपेठेतील गणेशोत्सव मंडळ स्थापन झाल्यानंतर च्या काही वर्षांनी मंडळामार्फत नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवात सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. फुगडी स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस ,दांडिया स्पर्धा, ऑर्केस्ट्रा, स्टेज शो ,महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम ,घुमट आरती ,कुंकूमार्चन, आदींचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या नवरात्र उत्सवात पहावयास मिळते. दोडामात सोबत नजीकच्या गोव्यातीलही अनेक कलावंत या नवरात्र उत्सवात कार्यक्रमांच्या निमित्ताने सहभागी होतात.
नवरात्र उत्सव समिती जाहीर….!
यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे. त्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे…
नितीन मणेरीकर (अध्यक्ष )आनंद कामत (सचिव )प्रमोद परमेकर, (उपाध्यक्ष )विशाल मणेरीकर (खजिनदार. )सदस्य.. सागर चांदेलकर, विलास मिरकर ,प्रवीण आरोंदेकर ,रजत राणे ,पंकज मणेरीकर ,आशीर्वाद मणेरीकर व सुमंत मणेरीकर.









