एरिक्सनच्या अहवालात माहिती : सध्याला 30 टक्के ग्राहक वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये 2023 मध्ये 3.1 कोटी इतकी 5जी फोन घेणाऱ्यांची संख्या होणार असल्याचा अंदाज एरिक्सन यांच्या अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे. एरिक्सन कंझ्युमरलॅब ग्लोबल यांच्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. 4जीच्या तुलनेमध्ये 5 जी सेवा घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये 30 टक्के इतकी वाढ झालेली आहे. उद्योगांमध्ये आलेली प्रगती आणि अर्थव्यवस्थेत आलेली बळकटी पाहता येणाऱ्या काळामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त 5 जी फोन घेणाऱ्यांची संख्या होणार आहे.
इतर देशांमध्ये सेवा सुरु
सध्या 5 जी फोन वापरकर्ते व्हिडिओ स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल कॉलिंग आदीसारख्या सेवांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, चीन आणि इतर देशांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 5जी सेवा वापरकर्त्यांनी जवळपास आठवड्याला दोन तास इतका वेळ 5 जी सेवेचा वापर करण्यात घालवला आहे.









