वृत्तसंस्था/ गुंटूर
आंध्रप्रदेशचे पर्यटनमंत्री आर.के. रोजा यांच्या विरोधात कथित अपमानास्पद टिप्पणी प्रकरणी तेदेपचे वरिष्ठ नेते बी. सत्यनारायण मूर्ती यांना अटक करण्यात आली आहे. 68 वर्षीय मूर्ती यांना सोमवारी रात्री अनाकालपल्ली जिल्ह्यातील परवाडा येथे अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

मूर्ती यांना गुंटूर येथे आणले गेले असून न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमा महेश्वर रे•ाr यांनी सांगितले आहे. मूर्ती यांना भादंविचे कलम 153 अ, 354 अ, 503 आणि 504 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. मूर्ती यांच्या विरोधात गुंटूर जिल्ह्dयात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांच्याविरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी एक तर दुसरी तक्रार मंत्री रोजा यांना उद्देशून अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी नोंदविण्यात आली होती.
मूर्ती यांच्या अटकेवेळी हाय-व्होल्टेज ड्रामा देखील दिसून आला. गुंटूर पोलीस 100 हून अधिक कर्मचाऱ्यांसोबत रविवारी मध्यरात्री तेदेप नेत्याच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु मूर्ती यांनी स्वत:ला घरात बंद करून घेतल्याने पोलिसांना त्यांना अटक करणे अवघड ठरले होते. याचदरम्यान शेकडो कार्यकर्ते मूर्ती यांच्या घरी पोहोचले. या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाली होती.









