लाखो भाविकांकडून सढळ हस्ते दान : सरकारच्या शक्ती योजनेमुळे देणगीत वाढ
वार्ताहर /बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिरातील दानपेटी शनिवारी खुली करण्यात आली. यल्लम्मा देवीच्या भक्तांनी गेल्या चाळीस दिवसांत 1 कोटी 3 लाखाहून अधिक रक्कम रेणुकाचरणी अर्पण केली आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेली मोजणी रविवारी पूर्ण झाली. या दानपेट्यांमधील रकमेची ईन पॅमेऱ्याद्वारे भाविकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.
यासाठी यल्लमा मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व संबधित देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीतील रकमेसह मौल्यवान दागिनेही मोजण्यात आले. त्यामध्ये 93 लाख 64 हजार 260 ऊपये रक्कम, 7 लाख 50 हजार 600 ऊपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 87 हजार 860 ऊपये किमतीचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत. अशाप्रकारे दानपेटीत एकूण 1 कोटी 3 लाख ऊपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. गेल्या 40 दिवसांपासून भाविकांनी हुंडीत दान केलेली रक्कम, सोने, चांदीचे दागिने मोजण्याचे काम रविवारी पूर्ण झाले आहे.
यावेळी देवस्थान कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर अखेरच्या दिवसात आलेल्या भाविकांनी 1 कोटी 3 लाख ऊपये देवीच्या चरणी अर्पण केले असून सरकारच्या शक्ती योजनेमुळे देणगीचे प्रमाण वाढले आहे. सदर रक्कम मंदिराच्या विकासाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आता 2000 ऊपयांची नोट चलनात नसल्याने ती दानपेटीत न टाकण्याचे आवाहन केले आहे. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य वाय. वाय. काळप्पण्णावर, देवस्थानचे अभियंता ए. बी. मुळ्ळूर, धर्मादाय खात्याचे साहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ आदी उपस्थित होते.









