कडेगांव, प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी विश्वास टाकला म्हणून आज ग्रीन पॉवर शुगर्स यशस्वीरित्या १० व्यावर्षी गाळपासाठी सज्ज आहे. शेतकऱ्यांचे ऋण नेहमी या कारखान्यावर असणार आहे त्यामुळेच यावर्षीच्या गाळपामध्ये उच्चांकी दर देणार असल्याचे प्रतिपादन ग्रीन पॉवर शुगरचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते रायगांव (हिंगणगांव) ता. कडेगाव येथे ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूज कारखान्याच्या 18 व्या वार्षिक सर्वसाधारण सभी वेळी बोलत होते.
यावेळी सल्लागार अपर्णाताई देशमुख, महिला संचालक शितल यादव, संचालक चंद्रकांत पाटील, अशोक मुळीक, संदिप यादव जनरल मॅनेजर हनमंतराव जाधव, कंपनी सेक्रेटरी विश्वासराव बोकील, अकबर शेख प्रमुख उपस्थित होते.
टेंभू योजनेचे शिल्पकार स्व. संपतराव आण्णा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या सभेची सुरुवात झाली. नंतर अहवाल सालात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, सहकार क्षेत्रातील दिवंगत थोरव्यक्ती देशसेवा बजावताना धारातीर्थ पडलेले वीर जवान, अतिवृष्टी, पूर,अपघात यासारख्या नैसर्गिक उत्पन्नामध्ये प्राण गमालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सूत्रसंचालन के.एन.यादव यांनी केले. सभेच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख यांनची निवड करण्यात आली. त्यास सूचक संदीप बबन यादव व अनुमोदक म्हणून तर चंद्रकांत गोरख पाटील होते. सभेच्या नोटिसाचे वाचन हनमंतराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अशोक मुळीक यांनी केले राष्ट्रगीता नंतर सभेची सांगता झाली.यावेळीं कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कर्मचारी खाते प्रमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.