मुंबई
बांधकाम क्षेत्रात आगामी काळात 22 प्रकल्पांची उभारणी एकट्या रुस्तमजी समूहाकडून होणार असल्याची माहिती आहे. यासाठी कंपनी 35 हजार कोटी रुपये इतके खर्च करणार आहे. सदरचे बांधकाम प्रकल्प हे मुंबई आणि परिसरात आकाराला येणार असल्याचे सांगितले जात आहे. 35 दशलक्ष चौ. फूट इतकी जागा बांधकाम प्रकल्पांअंतर्गत विकसित केली जाणार आहे. कंपनीचे चेअरमन बोमन इराणी यांनी ही माहिती शेअरबाजाराला दिली आहे.