राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी येथे सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन ग्रुप डान्स, लाईटईफेक्ट,डॉल्बीचा दणदणाट तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आले.
राधानगरी येथील सुमारे वीसभर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती चे विसर्जन शहराजवळील ओढ्यात पहाटे 3 वाजेपर्यंत सर्व गणेश मंडळाचे श्री चे विसर्जन करण्यात आले, दुपारी चारच्या सुमारास मानाचा पहिला गणपती शाहू तरुण मंडळ त्याच्या पाठोपाठ गणेश तरुण मंडळ, शिवशक्ती, सह्याद्री, शिवाजी ,सिद्धिविनायक, साईचौक, वाघाची तालीम, ग्रामदेवता अंबाबाई ,गुडलक आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एका पाठोपाठ रांग लावून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने विसर्जन सांगता करण्यात आली, यावर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने रशियन डान्सग्रुप विशेष आकर्षण होते.
येथील 10 मंडळांनी कोल्हापुर, पूणे,मुंबई, गोवा,आदी ठिकाणच्या ग्रुप डान्सना पाचारण केले होते. तसेंच साऊंड सिस्टिम,लाईट ईफेक्टमुळे संपुर्ण राधानगरी परिसर दणदणून गेला होता. रंगीबेरंगी प्रकाशझोतात संपुर्ण गाव उजळुन गेले होते. ही मिरवणूक पाहाण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, गणेश मंडळाच्या स्वागतासाठी खंडोबा फ्रेंडस सर्कल व व्यापारी संघटनेच्या वतीने सर्व मंडळाच्या गणपतीना श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला,
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैणात करण्यातआला होता शिवाजी तरुण मंडळाने डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढली तर रात्री 12 वाजता सर्व साऊंड सिस्टिम बंद करण्यात आली, येथील औषध विक्रेते संजय गोजारे यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांना चहाचे वाटप केले,त्यानंतर गावाशेजारी असलेल्या ओढ्यात गणेश मूर्ती विसर्जन करुन मिरवणूकीची सांगता करण्यात आली. विसर्जन काळात गणेश भक्तांची सोय उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रेकटर व रस्त्याच्या दुतर्फा हॅलोजनची सोय केली होती