वार्ताहर/हरमल
मांद्रे पंचायत क्षेत्रांतील जुनसवाडा फॉरेस्ट पार्कनजीकच्या ग्रील अँड हॉटेल्स येथे बेशिस्त वाहन पार्किंग होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे सामान्य वाहन चालकांना नाहक त्रास होत होतो. यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मांद्रे मगो गट समिती अध्यक्ष प्रविण वायगंणकर यांनी केली आहे. आता पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. जुनसवाडा ग्रील हॉटेल्समध्ये ग्राहकाच्या चारचाकी मोठ्या गाड्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पार्क करून ठेवत असल्याने वाहन चालविणे कठीण बनले असल्याचे वायगंणकर यांनी सांगितले. कित्येकवेळा दोन्ही बाजूच्या पार्किंगमुळे, दोन्ही बाजुंनी वाहनाची भली मोठी रांग लागलेली असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन, बाचाबाची नित्याची झाल्याचे वायगंणकर यांनी सांगितले.
रस्त्यांनजीक परवाने कसे, पार्किंगची सोय नाही
किनारी भागांत अनेक हॉटेल्स रस्त्यांनजीक असून त्यांना परवाने देताना कोणत्याही अटींची पूर्तता केली नसल्याचे ग्रामस्थ अनिकेत मांद्रेकर यांनी केली.हॉटेल्स व्यावसायिकाना पार्किंग सुविधा नसताना, परवाने कसे काय दिले जाते,असे मत मांद्रेकर यांनी व्यक्त केले.एरव्ही सरकारी खाती चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करीत असते, मात्र वाहतूक खात्याचे दुर्लक्ष वाहन चालकांचा जीवावर उठण्याची मागणी होत आहे. संबंधितांना रस्त्यांवरील किमान दोन्ही बाजूने असलेले अडथळे दूर करण्याचे आदेश पोलिसांनी द्यावे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वायगंणकर यांनी केली आहे. दंडात्मक कारवाईपेक्षा रस्त्यांवरील बेधुंद व अस्ताव्यस्त पार्किंगकडे पोलिसांनी लक्ष देऊन वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वायगंणकर यांनी केली आहे.









