शिवसेना सीमाभाग आयोजित उत्कृष्ट श्रीमूर्ती स्पर्धा निकाल जाहीर
बेळगाव : शिवसेना सीमाभागतर्फे उत्कृष्ट श्रीमूर्ती स्पर्धा-2023 चे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव दक्षिण व उत्तर अशा दोन विभागांतून स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक उत्तर विभागातून पाटील मळा गणेशोत्सव मंडळाने तर दक्षिण विभागातून सोनार गल्ली, वडगाव या गणेशोत्सव मंडळाने मिळविला. विजेत्यांना शिवसेनेतर्फे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. उत्तर विभागातून द्वितीय- सिंहगर्जना युवक मंडळ, कोनवाळ गल्ली, तृतीय- गणेशोत्सव मंडळ बसव कॉलनी, बॉक्साईट रोड, दक्षिण विभागातून द्वितीय- महाद्वार चौक, महाद्वार रोड, तृतीय- रामलिंगवाडी, गोवावेस, शहापूर येथील गणेशोत्सव मंडळांनी मिळविला. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









