सौंदर्य खुलवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला दागिन्यांची गरज असते. अशावेळी स्वस्त आणि आकर्षक दागिने म्हणून सोन्यापेक्षा कृत्रिम दागिन्यांना जास्त पसंती दिली जाते.आणि वेगवेगळ्या लुक वर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम दागिने साठवले जाता. पण हे कृत्रिम दागिने खूपच नाजूक असतात आणि ते काळजीपूर्वक साठवले जाणे आवश्यक आहे जेणेकरून ते खराब होणार नाहीत. चला तर मग आज आपण या दागिन्यांची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊयात.
कृत्रिम दागिनेओलाव्याच्या संपर्कात आल्यास खराब होऊ शकतात आणि त्यांचा रंग खराब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दागिने हवाबंद बॉक्स किंवा झिप लॉक मध्ये ठेवा. यामुळे हवा किंवा इतर वायू आत जाण्यापासून किंवा बाहेर जाण्यापासून प्रतिबंधित करते.
दागिन्यांचा प्रत्येक तुकडा स्क्रॅच किंवा नुकसान टाळण्यासाठी मऊ पाउचमध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये ठेवा. तुम्ही स्वतंत्र कप्प्यांसह दागिन्यांचा बॉक्स देखील वापरू शकता.
दागिने आणि परफ्युम्स एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. कारण परफ्यूममध्ये रसायने असल्यामुळे दागिने खराब होऊ शकतात.
तुमचे सोन्याचे दागिने इतर दागिन्यांसह ठेवू नका, विशेषत: हिरे किंवा इतर रत्नांसारख्या कठिण वस्तूंनी बनवलेले दागिने, कारण ते सोने स्क्रॅच करू शकतात.
प्रत्येक महिन्यातून एकदा दागिने ब्रशच्या साहाय्याने स्वछ करून ठेवावेत.
आजकाल बाजारात किंवा ऑनलाइन शॉप्स वर दागिने ठेवण्यासाठी छोटे छोटे कप्पे असणारे बॉक्स उपलब्ध आहेत. अशा बॉक्स मध्ये आपले दागिने व्यवस्थित राहू शकतात.