पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्य उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, 25 सप्टेंबर रोजी येथे दिल्लीत त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची मुख्य उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 72 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयासमोरील उद्यानात हा विशाल पुतळा बसवण्यात आला. आज आपल्या सर्वांसाठीचे प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा पवित्र सोहळा आहे. याप्रसंगी येथे भव्य पुतळा उभा राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधानाची भावना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान मोदींनी जयपूरमध्ये भाजपच्या संकल्प महासभेला संबोधित केले. याचबरोबर जयपूर जिह्यातील धनक्मया गावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना श्र्रद्धांजली वाहिली. जयपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनक्मया गावात उपाध्याय यांनी बालपण घालवले. याठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मारक बांधण्यात आले आहे. मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत स्मृतीस्थळालाही भेट दिली.









