व्यवहार चोख नसल्याचा आरोप, संस्था मालमत्तासह अन्य विषयांवरून वातावरण तापले
वाळपई : प्रगती पुस्तकावर निर्देशित करण्यात आलेली आकडेवारी या संदर्भात स्पष्टपणे माहिती देण्यास अपयशी ठरल्याबद्दल सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली.सभासदांनी अनेक विषयासंदर्भात संचालक मंडळाला धारेवर धरले. यावर चेअरमन अनिल काटकर यांनी यावेळी थातुरमातुर उत्तरे देऊन पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व व्यवहार चोख सादर करण्याचे आश्वासन दिले. सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहामध्ये संस्थेचे चेअरमन अनिल काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सगुण वाडकर संचालक पांडुरंग गावस, नारायण गावकर सीताराम देसाई, शहाजी देसाई, सुरंगा नाईक, प्रदीप गंवडळकर, कृषी अधिकारी विश्वनाथ गावस व इतरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सभासदांनी सभासदांनी विविध संचालक मंडळावर प्रश्नांचा भडिमार गरमागरम चर्चा केली. सभासदांनी विचारलेल्या अनेक प्रŽावर उत्तर देण्यास कार्यकारी संचालक अपयशी ठरल्यामुळे अनेकवेळा वातावरण तापले.
मागील इतिवृत्तात फेरफार झाल्याचा आरोप
सभेच्या सुऊवातीलाच मागील सभेच्या इतिवृत्तात अनेक मुद्दे गायब असल्याचा आरोप सभासद दशरथ मांद्रेकर धनंजय देसाई यांनी केला. संस्थेच्या दिवगंत सभासदांना श्र्रद्धांजली वाहण्याची मागणी राम चोर्लेकर यांनी केली. यावेळी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रŽासंदर्भात दुऊस्ती अहवालाबाबत स्पष्टीकरण न दिल्याचा आरोप कांता गावकर यांनी केला.
विशेष अधिकारी परब यांनी राजीनामा का दिला?
दरम्यान, नियुक्त विशेष अधिकारी राघोबा परब यांनी अवघ्या काही महिन्यातच पदाचा राजीनामा का दिला. याबाबत राम चोर्लेकर ,दशरथ मांद्रेकर, उदय सावंत, गोपाळ नाईक यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. नंतर कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांच्याकडे मागितले मात्र त्यांनीही मौन राखले.
सत्तरी अपना बाझार शेड उभारण्याचा उद्देश काय?
अपना बाझार नजीक हजारो रुपये खर्चून उभारलेल्या शेडसंदर्भाचा खर्च व उभारण्याचे कारण देण्याची मागणी दशरथ मांद्रेकर यांनी केली. यावर कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी दोन महिन्यांत सदर शेडमध्ये संस्थेचा व्यवसाय सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
संस्थेची मालमत्ता वाचविण्यास संचालक मंडळ अपयशी
दरम्यान संस्थाच्या मालकीच्या केरी, होंडा या ठिकाणी असलेल्या मालमत्ता वाचविण्यात संचालक मंडळ अपयशी ठरलेले आहे. या संदर्भात प्रŽ संस्थेचे सभासद विष्णू पारोडकर, दशरथ मांद्रेकर, भीमराव राणे, नामदेव गावस, यांनी उपस्थित केला केला. होंडा येथील इमारतीकडे संचालक मंडळ दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारचा आरोप केला.
माजी चेअरमन गावस यांच्यावर अविश्वासाचे कारण काय?
दरम्यान संस्थेचे मावळते चेअरमन पांडुरंग गावस यांच्यावर अविश्वास दाखल केल्यामुळे संस्थेची बदनामी झाली. याचे कारण सभासद दशरथ मांद्रेकर व इतरांनी विचारले असता चेअरमन अनिल काटकर यांनी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. मात्र यावरून मोठे गदारोळ झाला.
काजू कलमांचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर!
गेल्या दोन वर्षापासून संस्थेतर्फे अनुदान स्वरूपात काजू कलमे विक्री करण्यात येत आहेत. मात्रत् एक वर्षे उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. या संदर्भाचे स्पष्टीकरण देण्याची मागणी राम चोर्लेकर व इतरांनी केली. याबाबत अनिल काटकर यांनी या संदर्भात विशेष लक्ष देण्याची आश्वासन दिले व शक्मय तेवढ्या लवकर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती सर्वसाधारण सभेला दिली.
दोन महिन्यांत सर्व स्वयंसेवा भंडार संगणीकृत!
चेअरमन अनिल काटकर यांनी सर्व भंडारामध्ये संगणीकरण करण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार. यामुळे जे स्वयंसेवी भांडार नुकसानीत चालत आहेत त्यावर बऱ्याच प्रमाण नियंत्रण येणार असून संस्थेच्या विकासासाठी संचालक मंडळ कटिबद्ध झाल्याचे स्पष्ट केले. कर्मचारी पगारवाढ. वाळपई येथील संस्थेच्या इमारतीमधील भाडेकरू, स्वयंसेवा भांडार आदी विषयांवर म्हाळू गावस, पांडुरंग नाईक यांनी चर्चा केली. यावेळी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा सभासद धनंजय देसाई,उदय सावंत व राम चोर्लेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुऊवातीला संस्थेचे जर्मन अनिल काटकर यांनी स्वागत केले. सगुण वाडकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी केले.









