कसबा बीड,कोल्हापूर
Kolhapur News : शिरोली दुमाला ता. करवीर येथ नूतन दूध संस्थांनी गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले.करवीर तालुक्यातील नवीन दूध संस्थांना नोंदणीप्रमाणपत्र व गोकुळच्या शेअर्स प्रमाणपत्रांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, करवीर तालुका मोठा असून येथे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गरज पाहून नवीन संस्थांना दूध संकलनास परवानगी दिली आहे.नवीन संस्थानी गोकुळच्या विविध योजना व सेवा सुविधांची माहिती दूध उत्पादकांना देऊन त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
वीरशैव को.ऑप.बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी प्रास्ताविक केले.के. वाय. पाटील यांनी आभार मानले.यावेळी माजी सरपंच एस.के.पाटील, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील,दीपक पाटील भगवान पाटील,सरदार पाटील,दगडू आरडे,भगवान पाडळकर,एस. आर. कारंडे,प्रकाश कदम,अमर पाटील,राजाराम आरडे,विलास आरडे,कृष्णात आरडे,तातोबा वाकरेकर,लक्ष्मी आरडे,सीमा पोवार,सरिता आरडे आदी उपस्थित होते.
दूध उत्पादकांनी केला ‘आबाजीं’चा गौरव
वाड्यावस्त्यांवर दूध संस्थांच्या माध्यमातून विश्वास पाटील (आबाजी) यांनी दूध वाढीसाठी प्रोत्साहन दिलेच, त्याचबरोबर दुर्गम भागातील शेतकऱ्यांना उभे करण्याची भूमिका घेतल्याबद्दल दूध संस्थांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला.