शनिवार-30 सप्टेंबर ही शेवटची तारीख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत काही दिवसांवर आली आहे. आरबीआयने शनिवार, 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून देशवासियांसाठी हा अंतिम आठवडा असणार आहे. बहुतांश ग्राहकांनी आपल्याकडील 2,000 रुपयांच्या नोटा आधीच जमा केल्यामुळे बँक शाखांमध्ये सध्या गर्दी दिसत नाही. तथापि, काही नोटा अजूनही चलनात असल्यास त्या जमा करण्यासाठी आणखी पाच-सहा दिवसांचा अवधीच शिल्लक राहिला आहे. आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 ही 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख ठरवली आहे. मात्र, या मुदतीत वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चलनातील 2000 च्या सर्व नोटा कमी करण्याच्या उद्देशाने आरबीआयने 19 मे रोजी देशवासियांना यासंबंधी महत्त्वाचे निवेदन जारी केले होते. आतापर्यंत या चलनी नोटांपैकी 93 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत.