राजस्थान हे राज्य तेथील वाळवंट, तुरळक पाऊस आणि रखरखीत कोरडे हवामा यासाठी प्रसिद्ध आहे. पण पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य असणाऱ्या या राजस्थानात एक हिरवेगार वन आहे. हे वन नैसर्गिक नाही. तर ते मानवाने निर्माण केले आहे. या राज्यातील माऊंट अबूनजीक ते असून आज ते या राज्याचे वैशिष्ट्या आहे.
ते तपोवन या नावाने ओळखले जाते. त्याचे क्षेत्रफळ फार मोठे नाही. ते 90 एकरांचे आहे. पण तेथे विविध प्रकारच्या 16 सहस्रांहून अधिक वनस्पती आहेत. या वनस्पतींमध्ये काळ्या द्राक्षांपासून खजुरापर्यंत आणि छोट्या गवतापासून आयुर्वेदिक औषधींपर्यंतच्या वनस्पतींची लागवड करण्यात आलेली नाही. वास्तविक राजस्थानात द्राक्षाचे पीक घेता येत नाही. पण या उद्यानात तोही चमत्कार पहावयास मिळतो. असंख्य प्रकारच्या आंब्याची झाडे हे या उद्यानाचे एक महत्वाचे वेशिष्ट्या आहे. ही सर्व वृक्षराजी नैसर्गिक पद्धतीने निर्माण केलेली असून कोणत्याही रासायनिक खतांचा उपयोग केला जात नाही. येथे जैविक खते आणि र्नैसर्गिक कीटनाशके निर्माण केली जातात. तसेच त्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षणही दिले जाते. वृक्षाची, विविध पीकांची, फळझाडांची आणि फुलझाडांची लागवड कशी करावी, याचेही प्रशिक्षण दिले जाते. येथे योगसाधनेचेही प्रशिक्षण दिले जाते. ब्रम्हाकुमारी ईश्वरीय संस्थान या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेकडून या वनाचे व्यवस्थापन केले जाते. येथे एक गोशाळा असून 35 गाईंचे पोषण केले जाते. गाईंचे शेण आणि गोमूत्र यांच्यापासून विविध पदार्थ निर्माण केले जातात.









