कळंबा, प्रतिनिधी
कळंबा संवर्धनाला गणेश भक्तांनी यंदाही पाठबळ दिले.भाविकांनी ग्रामपंचायतीच्या काहिली व कुंडांचा वापर करत प्रशासनाला सहकार्य केले. कळंबा व उपनगरात विसर्जित मूर्ती तसेच मूर्तिदानातून जमा होणाऱ्या मूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यात आले.
कळंबा परिसरात ग्रामपंचायत, महापालिका व ग्रामस्थांच्यावतीने रात्री उशिरा पर्यंत या परिसरातील जवळपास सहा हजार मूर्ती व दीड टन निर्माल्य पालिका आणि कळंबा ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विघमाने संकलित करण्यात आले.तर ग्रामपंचायतिने दहा ट्रॅक्टर ट्रॉली चे ही नियोजन केले होते त्याबरोबरच श्री मूर्ती दान करूनही काही जणांनी ‘कळंबा तलाव बचाव समिती ने ’खारीचा वाटा उचलला. तर निर्माल्यही तलावात विसर्जित न करता महापालिकेच्या ट्रॅक्टर व डंपरच्या साहायाने निर्माल्य कुंभात व ट्रॉलीमध्ये एकत्रित करण्यात आले व ते महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आले.
कळंबा तलावाचे वाढते प्रदूषण पाहता नागरिकांनी तलावाची जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांनी गेली चौदा वर्ष उदंड प्रतिसाद मिळत आहे. तलावात एकही मूर्ती विसर्जत करण्यात आली नाही.पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कळंबा येथे मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित सरपंच सुमन गुरव सदस्या मीना गौड, पूनम जाधव,माजी सरपंच विश्वास गुरव उत्तम जाधव धर्मेंद्र गौड चंद्रकांत नरके, नितीन गौड, ओंकार नरके, अमोल शिंदे,प्रसाद नरके आदी उपस्तीत होते