बेळगाव : शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत होती. मागणीनुसार सोमवारी मनपा कर्मचाऱ्यांनी खडेबाजार व नरगुंदकर भावे चौक या परिसरात मोकाट जनावरे पकडली. त्यानंतर त्यांना हलगा येथील गो-शाळेत पाठविले.
गणेशोत्सव काळात ही जनावरे अडथळा ठरत होती. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेवरून ही जनावरे पकडण्यात आली आहेत. शहरात अजूनही काही ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे. भर रस्त्यातच ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून त्या जनावरांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.









