लोकमान्य सोसायटी पुरस्कृत 14 वर्षाखालील राष्ट्रीय उपकनिष्ठ मुलींची फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मान्यताप्राप्त कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य को. ऑप. सोसायटी पुरस्कृत राष्ट्रीय 14 वर्षाखालील मुलींच्या उपकनिष्ठ फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ओडिशाने राजस्थानचा 4-1 तर तेलंगणाने चंदिगडचा 1-0 असा निसटता पराभव करत प्रत्येकी 3 गुण मिळविले. माळमारुती येथील लव्हडेल स्कूल येथे स्पोर्टींग प्लॅनेट अॅस्ट्रोटर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ओडिशाने राजस्थानचा 4-1 असा पराभव केला. 17 व्या मिनिटाला ओडिशाच्या आचलच्या पासवर रितू बाडनीने गोल करुन 1-0 ची आघाडी राजस्थानच्या कोहिनूर गोल करुन 1-1 अशी बरोबरी पहिल्या सत्रात केली. दुसऱ्या सत्रात 42 व 56 व्या मिनिटाला ओडिशाच्या आचल सिंगने दोत गोल करून 3-1 अशी आघाडी मिळविली. जादा वेळात 73 व्या मिनीटाला ओडिसाच्या बंदना नाईकने गोल करून 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अपयश आले. दुसऱ्या सामन्यात तेलंगनाने चंदिगडचा 3-1 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात 29 व्या मिनिटाला तेलंगनाच्या जी. समिक्षाने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला तेलंगणाच्या जानवी यादवने गोल करून 2-0 आघडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला ओडिशाच्या जी. सीमक्षान तिसरा गोल करून 3-0 अशी आघडी मिळवून दिली. 62 व्या मिनिटाला चंदिगडची कर्णधार काजल गोल करून 1-4 अशी आघाडी कमी केली. या सामन्यात चंदीगडने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या
सोमवारचे सामने : 1) उत्तरप्रदेश वि. त्रिपुरा सकाळी 8.30 वा. 2) कर्नाटक वि. मध्यप्रदेश दुपारी 3 वा.









