वृत्तसंस्था/ रियो डे जेनोरियो (ब्राझील)
ब्राझीलमध्ये सध्या सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल-पिस्तुल नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेमबाज सागर डांगीला पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारातील 8 स्पर्धकांचा सहभाग असलल्या अंतिम फेरीत 21 वर्षीय सागर डांगीने 157.4 गुण नोंदवत सहावे स्थान मिळवले. इटलीच्या फेड्रिको मालदिनीने या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. ब्राझीलमधील सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचे 16 जणांचे पथक सहभागी झाले आहे. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत अर्मेनियाने सुवर्णपदक पटकावले.









