नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दिल्लीच्या द्वारका येथे यशोभूमी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यशोभूमी हे जागतिक स्तराचे एक्स्पो सेंटर आहे. 8.9 लाख चौरस मीटरपेक्षा अधिक आकार असलेल्या क्षेत्रासह यशोभूमी हे जगातील सर्वात मोठ्या एमआयसीई (मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झिबिशन) सुविधांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणार आहे. या कन्व्हेंशन सेंटरमध्ये मुख्य ऑडिटोरियम, ग्रँड बॉलरुम समवेत 15 कन्व्हेंशन रुम्स आणि 13 मीटिंग हॉल्स आहेत.









