वॉशिंग्टन :
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे पुत्र हंटर हे 2018 मध्ये हँडगन खरेदी करतेवेळी स्वत:च्या अमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल खोटी माहिती देणे आणि अवैध स्वरुपात शस्त्र बाळगल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात आता खटला चालविला जाणार आहे. तसेच हंटर यांच्या आर्थिक देवाणघेवाणीबद्दलही चौकशी करण्यात येत आहे. अमेरिकेच्या इतिहासात कुठल्याही अध्यक्षांच्या पुत्राबद्दल पहिल्यांदाच असे घडले आहे.









