नवी दिल्ली
लॉजिस्टिक आणि साखळी पुरवठा व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एनटीसी समूहाने इंडोनेशिया बाजारामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या व्यवसायाचा डंका तेथेही वाजवण्यासाठी एनटीसी समूह सज्ज झाला आहे. इंडोनेशियात अलीकडेच जकार्ता येथे कंपनीने आपली सेवा सुरू केली आहे. सिंगापूर, मलेशिया, हॉंगकॉंग, बेल्जियम या देशांना कंपनी सेवा पुरवत आली आहे. इंडोनेशियात नव्याने उतरुन आपल्या व्यवसायाला अधिक गती देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे.









