ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान आरोस येथे बीएसएनएल सेवा विस्कळीत
न्हावेली / वार्ताहर
ऐन गणेशोत्सवा दरम्यान आरोस गावातील बीएसएनएल सेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. नेटवर्कच्या समस्याने गावातील नागरी हैराण झाले आहेत. गेले पंधरा दिवस सुरळीत नेटवर्क अभावी गावातील विद्यार्थी, नोकरदार, ऑनलाईन काम करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. गणेशोत्सवापूर्वी बीएसएनएल सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आरोस सरपंच शंकर नाईक यांनी दिला.
आरोस गावासाठी स्वतंत्र टॉवर उभारण्यात आला आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून नेटवर्कची समस्या तीव्र जाणवत असल्याने सदर टॉवर शोभेची बाहुली बनला असल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले. संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दूरध्वनी सेवेत कोणताच बदल होत नसल्याने आम्हाला आंदोलनासारखा पवित्रा घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावात चाकरमानी दाखल झाले आहे. काही जणांना ऑनलाईन तिकीट बुक करताना नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचे काही चाकरमान्यांनी सांगितले. त्यामुळे गावावरील बीएसएनएल नेटवर्क सेवेचे संकट चतुर्थी पूर्वी दूर करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आरोस सरपंच शंकर नाईक यांनी दिला.









