चिपळूण: प्रतिनिधी
चिपळूण किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाल्याची घटना मिरजोळी येथे बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. यात एकावर तलवारीने वार करण्यात आला आले असून हातोड्याने डोक्यात गंभीर जखम करण्यात आली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. अन्य एकजणही जखमी झाला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून २० जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गुरुवारी येथे भेट देऊन माहिती घेतली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साद पेवेकर व कैफ पेवेकर हे दोघे बुधवारी रात्री मिरजोळी येथील मंगेश पवार याच्या टपरीवर चेष्टा मस्करीत शिवीगाळ करीत होते. यावेळी येथे असलेल्या साजिद बशीर बेबल (३६. शिरट) याने माझ्याकडे बघून आवाज का वाढवताय, असे विचारून कैफ याच्या कानाखाली मारले त्यामुळे कैफ व साद यांनी आपल्या नातेवाईक व मित्रांना बोलावून घेतले. यामुळे दोन गटात येथे तुफान राडा झाला. यावेळी अज्ञाताने साद याचे वडील शकील पेवेकर यांच्या डोक्यात हातोडा मारून हातावर तलवारीने वार केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यामुळे शकील यांची प्रकृती गंभीर बनली असून त्यांच्यासह अमित मोरे हा जखमी झाला. सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे साद याने दिलेल्या फिर्यादीवरून साजिद बेबल, महादेव सखाराम वाघे (५५. कळवडे), काशिनाथ उर्फ कल्पेश वामन मोरे (३३, शिरळ), अमित अरविंद निवाते (३६. मिरजोळी), रणजित वसंत भडवळकर (३८. वैजी-भोम) यांच्यासह या गटातील १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर साजिद बेबल याच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील १० जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मिरजोळी येथे राडा झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे. 7. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप पथकाने घटनास्थळी भेट दिली. त त्यानंतर मिरजोळीसह कोंडे हॉस्पीटल, उक्ताड नाका येथे चोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात तैना करण्यात आला. गुरूवारी काही ठिकाणचा बंदोबस्त कमी करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अप जिल्हा पोलीस अधीक्षक जय गायकवाड यांनी गुरूवारी येथे दिली. त्यांनी फिर्यादी व आरोपीची माहिती घेतली. त्यानंतर तपासाबाबत मार्गदर्शन घेऊन करून त्या रत्नागिरीत
गेल्या.









