वार्ताहर /किणये
तालुकास्तरीय माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धा के. एस. आर. पी. मच्छे येथे झाल्या या स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले आहे. या यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैयक्तिक खेळ प्रकारात सुचित्रा कांबळे हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक व 200 मी. धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. प्रणाली साळवी हिने थाळीफेक द्वितीय क्रमांक, रेखा पाटील गोळा फेक द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक मुलांमध्ये प्रणव कणबरकर थाळीफेक प्रथम क्रमांक,मंथन दळवी साखळी गोळा फेक प्रथम क्रमांक ,भरत कणबरकर साखळी गोळा द्वितीय क्रमांक, प्रथमेश संभाजी पोल वॉल्ट द्वितीय क्रमांक पटकाविला. सांघिक खेळामध्ये मुलांच्या व मुलींच्या थ्रो बॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे ,क्रीडा शिक्षक एस एन बेळगुंदकर तसेच सह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.









