दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी आज होणार चौकशी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुऊवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना समन्स बजावले आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी तपासात सहभागी होण्यासाठी तपास यंत्रणेने समन्स जारी केले आहे. आतापर्यंत याप्रकरणी किमान 10 ते 12 जणांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. कविता यांचीही यापूर्वी मार्चमध्ये ईडीच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान त्यांच्या मोबाईलचीही तपासणी करण्यात आली होती.
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळ्यात कविता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यात राजकीय संगनमत झाल्याचा दावा केला जात आहे. तपासादरम्यान ईडीने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातील आरोपी, कविताचे चार्टर्ड अकाउंटंट, बुचीबाबू गोरंटला यांची जबानी नोंदवली होती. दिल्ली सचिवांच्या अहवालाच्या आधारे एलजींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. हा अहवाल गेल्यावषी 8 जुलै रोजी पाठवण्यात आला होता. ज्यामध्ये गेल्यावषी लागू करण्यात आलेल्या अबकारी धोरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मद्यविव्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केल्याने सरकारचे 144 कोटी ऊपयांचे नुकसान झाल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.









