वार्ताहर/ कुडाळ
भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत मंगळागौर स्पर्धेत श्री नवदुर्गा संघ (कुडाळ) चषकाचा मानकरी ठरला. महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या दिमाखात झालेल्या या स्पर्धेत संघांनी फेर धरत मने जिंकली. पारंपरिक फुगडी नृत्य सादरीकरण करताना समाज प्रबोधनपर काही किस्से व दाखलेही दिले.मोदी@9संकल्पनेतून व महिलांच्या मोदींजींनी कार्यान्वित केलेल्या योजना या संकल्पनेतून नऊच संघाची या मंगळागौर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील रंगमंचावर सदर स्पर्धा रविवारी सायंकाळी घेण्यात आली. या स्पर्धेचा शुभारंभ एन. व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर ( पांग्रड ) च्या विद्यार्थ्यांनी ”ए मेरे वतन के लोगो” या देशभक्तीपर गीताने केला. स्पर्धेचे उदघाटन भाजपच्या रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चाच्या सचिव शिल्पा मराठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. प्रश्नमंजूषा स्पर्धाही घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे,भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,नवनिर्वाचित महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे व पप्या तवटे यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेला भेट देत शुभेच्या दिल्या. महिलाचा हा पारंपरिक खेळ आहे.श्रावण महिन्यात या नृत्याला फार महत्व आहे.मंगळागौर हा संस्कृतीचा एक भाग असून महिलांचा सन्मान केला जातो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे
द्वितीय क्रमांक श्री सिद्धी गणपती संघ (कविलकट्टा), तृतीय क्रमांक कुडाळेश्वर महिला संघ (कुडाळ), उत्तेजनार्थ प्रथम भैरव जोगेश्वरी संघ (कुडाळ), उत्तेजनार्थ द्वितीय सखी फुगडी संघ (पावशी) यांनी मिळविला. तसेच सहभागी संघाना चषक व दोन हजार रुपये मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दीप्ती प्रभू व स्वाती रानडे यांनी केले. निवेदन ऋचा शिर्के यांनी केले. बक्षीस वितरण प्रभाकर सावंत, संध्या संध्या तेरसे,संजय वेंगुर्लेकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत भाजप महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी केले. बक्षीस वितरण प्रभाकर सावंत, संध्या संध्या तेरसे,संजय वेंगुर्लेकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महिला पदाधिकारी उषा आठल्ये, रेखा काणेकर,अदिती सावंत, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे,साधना माडये,आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, मुक्ती परब, तेजस्विनी वैद्य, विशाखा कुलकर्णी,अक्षता कुडाळकर,रेवती राणे,रचना नेरुरकर व आदी भाजप महिला मोर्चा पदाधिकारी यांनी सहकार्य केले.