वृत्तसंस्था/ कोलकाता
रग्बी इंडियाने चीनमध्ये होणाऱ्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून शीतल शर्माकडे महिला रग्बी सेव्हन्स संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
आशियाई स्पर्धेतील रग्बी 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असून भारतासह एकूण सात संघ यात सहभागी झाले आहेत. 50 दिवसांच्या शिबिरानंतर या स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडला आहे. आपला कोचिंग स्टाफने त्यांना मानसिक, शारिरीक व सायकॉलॉजिकली तयार केले असून या महिलांना भारतीयांचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे, असे रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस म्हणाले. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत 24 सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध सकाळच्या सत्रात आणि जपानविरुद्ध दुपारच्या सत्रात लढत होणार आहे. भारताचा फ गटात समावेश असून याच गटात विद्यमान विजेते जपान, हाँगकाँग, सिंगापूर यांचा समावेश आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय महिलांना गटात पहिल्या दोनमध्ये यावे लागणार आहे.
भारतीय रग्बी सेव्हन महिला संघ : श्वेता साही, संध्या राय (उपकर्णधार), ममा नाईक, कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील, शीतल शर्मा (कर्णधार), लछमी ओराओन, दुमुनी मरन्डी, हुपी माझी, शिखा यादव, तरुलता नाईक, प्रिया बन्सल.









