उद्यापासून विविध मार्गावर धावणार अतिरिक्त बस
बेळगाव : गणेशोत्सवासाठी परिवहनने गुरुवारपासून विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 80 अतिरिक्त बस विविध मार्गावर धावणार आहेत. मुंबई, पुणे, हुबळी, धारवाड, गोवा आदी ठिकाणी ही बससेवा उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. दरम्यान, लांब पल्ल्यासाठी परिवहनने अतिरिक्त बससेवा उपलब्ध केली आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या मूळगावी कुटुंबासह परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यासाठी विविध मार्गावर जादा बस धावणार आहेत. शिवाय प्रवाशांची संख्या वाढल्यास पुन्हा बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुणे, बेंगळूर, म्हैसूर, मुंबई व गोवा येथून प्रवाशांची ये-जा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीखातर लांब पल्ल्यासाठी सार्वजनिक बससेवेवर अतिरिक्त वातानुकूलित बसेस उपलब्ध केल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याबरोबर KSRTC.KARANATAKA.GOV.IN या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.
उत्पन्नात भर
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे परिवहनलादेखील जादा उत्पन्न मिळणार आहे. कोरोना काळात अतिरिक्त बससेवेतून मिळणारे उत्पन्न थांबले होते. मात्र गतवर्षीपासून सणासुदीच्या काळात परिवहनचे उत्पन्न वाढू लागले आहे.
प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्या
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. मुंबई, पुणे आणि बेंगळूरला जादा बसेस धावणार आहेत.
– के.के. लमाणी (विभागीय वाहतूक अधिकारी)









