वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने इंग्लंडमधील कौंटी चॅम्पियनशिपमध्ये झोकात पदार्पण केले. केंटकडून खेळताना नॉटिंगहॅमविरुद्धच्या डिव्हिजन एकमधील सामन्यात त्याने 3 बळी मिळविले.
आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असले तरी त्याने येथील सामन्यात प्रभावी प्रदर्शन करीत 63 धावांत 3 बळी मिळविले. त्याने नॉटिंगहॅमच्या मॅथ्यू माँटगोमेरी, लीन्डन जेम्स व कॅल्व्हिन हॅरिसन यांचा समावेश आहे. चहलच्या भेदक माऱ्यामुळे केंटने नॉटिंगहॅमचा डाव 265 धावांत गुंडाळून केंटला पहिल्या डावात 181 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. केंटने याआधी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला करारबद्ध केले होते. त्याने 5 सामन्यात प्रतिनिधित्व करीत 13 बळी मिळविले होते.









