गाणे गुणगुणल्यास गमवावा लागतो जीव
गाणी अत्यंत खास असतात, काही गाणी माणसांना शांतता प्रदान करत मूड सुधारण्यास सहाय्यभूत ठरतात. अनेकदा लोक पार्टी किंवा सोहळ्यांमध्ये स्टेजवर देखील गाणी म्हणू लागतात. फिलिपाईन्समध्ये लोक प्रत्येक गाणी म्हणू शकतात, परंतु केवळ एका गाण्याचा याकरता अपवाद आहे. एक गाणे गुणगुणल्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा करण्यात येतो. फिलिपाईन्समध्ये एक गाणे लाइव्ह गायल्यास कॉपीराइटपेक्षाही मोठी समस्या उद्भवते आणि लोकांचा जीव जातो.

जर तुम्ही फिलिपाईन्समध्ये फिरण्यासाठी जात असाल तर तुम्हाला तेथे एका गोष्टीबद्दल अत्यंत अधिक सावध रहावे लागते. तेथे कधीच गायक फ्रँक सिनात्रा यांचे ‘माय वे’ गाणे म्हणू नका. जर कुणी लाइव्ह स्टेजवर हे गाणी गात असल्यास त्याची हत्या करण्यात येते. आतापर्यंत 12 जणांची हत्या या गाण्यामुळे करण्यात आली आहे. फ्रँक सिनात्रा हे अमेरिकन गायक होते आणि त्यांचे ‘माय वे’ गाणे अत्यंत लोकप्रिय मानले जाते.
‘माय वे’वर फिलिपाईन्समध्ये बंदी घालण्यात आलेली नाही तरीही हे गीत तेथे कुणीच गात नाही. 1998 पासून या गाण्यापासून लोकांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. अनेक कॅरियोके बार्समध्ये देखील या गाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 1998 च्या काळापासून हे गाणे म्हणणऱ्याची हत्या केली जाते. हे गाणे गातानाच हत्या केली जाते किंवा गाणे म्हणून झाल्यावर त्वरित जीव घेतला जातो.
या कारणामुळे होतात हत्या
अखेर असे का होते असा प्रश्न उभा ठाकतो. लोकांनी या हत्या करणे का सुरू केले याचे कारण कुणीच जाणत नाही, गाणे हत्येचे कारण नसल्याचे काही लोकांचे मानणे आहे. फिलिपाईन्समध्ये असे अनेक कॅरियोके बार आहेत, जेथे हे गाणे गायिले जाते. तेथे अनेकदा लोक मद्यधुंद अवस्थेत असतात आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रs देखील असतात. केवळ मद्याची नशा, गाण्याची धून आणि शस्त्र असल्याने लोकांकडून हत्या होत असल्याचे सांगण्यात येते. गाण्याचे बोल देखील लोकांना हिंसेसाठी उत्तेजित करतात. पुरुष असण्याचा अर्थ काय हे गाण्याच्या ओळींमध्ये म्हटले गेले आहे. या गोष्टी ऐकून लोकांमध्ये हिंसा करण्याची उत्तेजना निर्माण होत असल्याचे बॅलेन नावाच्या पॉडकास्टरकडून सांगण्यात आले.









