मुंबई
सेन्सेक्स निर्देशांकातील आघाडीवरच्या कंपन्यांनी मागच्या आठवड्यात 1.30 लाख कोटी रुपयांची बाजार भांडवलामध्ये वाढ दर्शविली आहे. तेजीत असलेल्या शेअर बाजाराचा सर्वाधिक लाभ एचडीएफसी बँकेला उठविता आला आहे. मागच्या आठवड्यामध्ये बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 878 अंकांनी वधारला होता. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 37262 कोटींनी वाढून 12,30,015 कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल 24356 कोटींनी वाढून 16,56,934 कोटी रुपयांवर पोहोचले होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे बाजार भांडवल 23436 कोटींनी वाढून 12,59,902 कोटी रुपयांवर तर भारतीय स्टेट बँकेचे बाजार भांडवल 12271 कोटीनी वाढून 5,20,706 कोटी रुपयांवर पोहोचले होते. भारतीय एअरटेलचे भांडवल 11101 कोटींनी वाढत 4,95,368 कोटी रुपये झाले होते.









