वार्ताहर / कुडाळ
तालुक्यातील आंदुर्ले येथील आंदुर्ले खिंड ते आंदुर्ले संत गाडगे महाराज मार्ग कापडोसवाडी बस स्टॉपवर उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकीसन (गोविंद )मोर्ये यांनी स्वतःच्या जागेत प्रवाशांसाठी निवारा शेड विनामूल्य बांधून दिली आहे.
या बस स्टॉप वरून रोज शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ प्रवास करीत असतात. तेथील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहावे लागत होते. बस शेड नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. प्रवाशांना होणार त्रास दूर व्हावा, यासाठी उपसरपंच चंद्रकीसन (गोविंद )मोर्ये यांनी स्वतःच्या जागेत प्रवाशांसाठी निवरा शेड विनामूल्य बांधून दिली आहे. सरपंच व सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.









