मसुरे प्रतिनिधी
मसुरे देऊळवाडा मठवाडी येथील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुधाकर उर्फ सुधा दिगंबर पुरी यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी नुकतेच निधन झाले. मसुरे देऊळवाडा मठ येथील प्रसिद्ध असलेल्या हिरापुरी मठाचे ते मठाधिपती होते. त्यांच्या निधनामुळे मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.सुधा पुरी यांनी विज्ञान शाखेतून बारावी पर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथे काही वर्षे नोकरी केली. या नंतर पुन्हा गावी येऊन स्वतःच्या जमिनीत काजू रतांबा, आणि नारळाची आधुनिक बागायती शेती केली होती.कला, क्रीडा नाट्य,राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्याचे मोठे योगदान होते. नाट्य क्षेत्रात अभिनय आणि दिग्दर्शन यात त्यांचे वर्चस्व होते. हिंदू धर्माच्या रूढी परंपरा यांचा त्यांना गाढा अभ्यास होता. कीर्तन, संगीत शास्त्रा विशई त्यांचे चांगले ज्ञान होते. ते उत्तम शीघ्र कवी, उत्तम वक्ता, उतम गायक, क्रिकेट समालोचक होते. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलेल्याने सांस्कृतिक क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली,दोन बहिणी, भावोजी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील ऋषिकेश आणि सुदर्शन पुरी यांचे ते वडील होत.









