मंत्री केसरकरांच्या हस्ते पहाटे सहा वाजता झेंडा दाखवून वॉकथॉनची सुरुवात
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी इनरव्हील क्लबने सावंतवाडीत आरोग्य सुदृढतेसाठी ७ते 75 वयोगटातील नागरिकांना चालण्याची सवय लागावी यासाठी उपक्रम राबविला. या उपक्रमाचे कौतुक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. कै श्रीकांत यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर दीक्षित नियोजित केलेल्या सुदृढ आरोग्यासाठी पाच किलोमीटर चालण्यासाठी सावंतवाडी इनरव्हील क्लबने वॉकथॉन उपक्रमामध्ये ७ वर्षांपासून ७५ वर्षापर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते पहाटे सहा वाजता झेंडा दाखवून वॉकथॉनची सुरुवात झाली. इनरव्हील क्लब अध्यक्ष रीया रेडीज, सचिव डॉ . मीना जोशी, डॉ. नेत्रा सावंत ,श्रेया नाईक, शीतल केसरकर,डॉ करमरकर ,दर्शना तळेगावकर , सुमेधा नाईक ,देवता,सोनाली, भारती उल्का,मीनल,संजना,रेखा,अनिता प्रभू तसेच सावंतवाडीतील नागरिक आणि रोटरीचे सदस्य उपस्थित होते .









