रत्नागिरी: प्रतिनिधी
जैन पर्युषण काळात रत्नागिरी शहरातील मटण आणि चिकन सेंटर बंद ठेवण्याचे आदेश रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने दुकान चालकांना दिले आहेत. १२ सप्टेंबर पासून १९ सप्टेंबर पर्यंत मटण आणि चिकन सेंटर्स बंद ठेवा असे लेखी आदेश रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने काढले आहेत.
या आदेशामुळे मटण आणि चिकन विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने याबाबत राज्य शासनाकडून आदेश आल्याने आपण कार्यवाही केल्याची माहिती दिली आहे.









