कर्नाटक उपविजेते : बेळगावच्या ऋतुजा पवार, मयुरेश जाधव, तन्वी कारेकर यांना सुवर्णपदके
बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटना मान्यताप्राप्त आबा स्पोर्टस् क्लब व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य डायव्हींग स्पर्धेत महाराष्ट्राने 68 गुणांसह पहिले सर्वसाधारण विजेतेपद, 48 गुणांसह कर्नाटकने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांच्या विभागात 42 गुणांसह महाराष्ट्र प्रथम, 28 गुणांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर मुलींच्या गटात 26 गुण महाराष्ट्र प्रथम तर 20 गुणांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर बेळगावच्या ऋतुजा पवार, मयुरेश जाधव, तन्वी कारेकर यांनी सुवर्णपदके पटकाविली. निमंत्रितांच्या आंतरराज्य डायव्हिंग स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यातील जलतरण स्पर्धकांनी भाग घेतला होता. 12 वर्षांखालील मुले-मुली शिवतेज माने (महाराष्ट्र), तन्वी कारेकर (कर्नाटक), 14 वर्षांखालील गट युवराज अंजिखाने (महाराष्ट्र) व वंशिका चुंगीवडीयार (महाराष्ट्र), 17 वर्षांखालील गटात सोहम अदिनोल (महाराष्ट्र), अमग मलजी (महाराष्ट्र), 19 वर्षांखालील : मयुरेश जाधव (कर्नाटक), खुल्या गटात अभिषेक (तामिळनाडू), ऋतुजा पवार (बेळगाव, कर्नाटक).
बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, विनायक आर्कसाली, सुहास निंबाळकर, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, मोहन पत्तार, श्रीकांत शेटे, आर. व्यंकटेश, विश्वास पवार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना पदके, प्रशस्तीपत्र, चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून विश्वास पवार, शिवराज मोहिते, निकिता पवार, अश्विनी मोहिते, कौतुभ पोटे (सर्व बेळगाव), श्रीकांत शेटे (सोलापूर), आर. व्यंकटेश (बेंगळूर), जगदीश मुद्येण्णवर, भारती कोठारी (हुबळी) यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप मोहिते, अमित जाधव, रणजीत पाटील, विशाल वेसणे, भरत पाटील, सुनील जाधव, सतीश धनुचे, वैभव खानोलकर, रमेश कुलकर्णी, विनायक नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रसाद दरबंदर, निखील भेकणे, विजय भोगण, प्रांजल सुलधाड, किशोर पाटील, भूषण पवार, शुभांगी मंगलोरकर, ज्योती पवार आदी उपस्थित होते.









