वार्ताहर,जोतिबा डोंगर
जोतिबाच्या नावानं चांगभलं… दख्खनच्या राजाच्या नावानं चांगभलं…च्या गजरात , जोतिबाच्या श्रावणातील चौथ्या रविवार निमित्त हजारो भाविकांनी श्रीच्या दरबारात हजेरी लावून श्रीं चे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी श्रीस महाअभिषेक, महापोषाख, धार्मिक विधीकरुन श्री चरनी गुलाल, दवना, फुले, नारळ वाहिला.. या वेळी भक्तांनी चांगभलच्या गजरात गुलाल,खोबरे,खारका उधळल्या.
आज असंख्य भाविक भक्ताने श्री जोतिबा देवाची धार्मिक विधी ,पुजा-अर्चा,पुरण- पोळीचा नैवेद, मोठया प्रमाणात केला. दरम्यान नुकतीच दख्खनचा राजा जोतिबा देवाची श्रावण षष्ठी यात्रा , दिंडी सोहळा यात्रा ,लाखो भाविकांच्या उपस्थितीत ,चांगभला च्या गजरात मंगलमय वातावरणात संपन्न झाली, परंतू श्रावणातील चौथ्या रविवार निमित्त परत भाविक भक्तांनी ज्योतिबा डोंगरावर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आधी राज्यातुन भाविकाची जोतिबाच्या श्रावणातील चौथ्या रविवार निमित्ताने श्रीं चे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली होती.
श्रावणातील चौथ्या रविवार निमित्त दख्खनचा राजा जोतिबा देवाची एकादशी असल्यामुळे विठ्ठल रुपातील आकर्षक खडी सुवर्णालंकारीक महापुजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्री चे पुजारी कुमार बनकर, गणेश दादर्णे, संभाजी बुणे, गणेश बुणे ,प्रल्हाद झूगर, महेश बनकर , यांनी बांधली. तर नंदी, महादेव, चोपडाई, यमाई, दत्त्त, रामलींग, काळभैरव या देवांची सूवर्णालंकारीक महापुजा स्वप्निल दादरने ,गणेश चौगुले , कैलास ठाकरे यांनी बांधली होती.
श्रीं च्या मंदिरात केदारकवच ,केदारस्तोत्र व केदारमहीमा या सुक्तांचे पठन केरबा उपाध्ये, भानुदास उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, बंडा उमरानी, शरद बूरांडे, गणेश उपाध्ये, सुरज उपाध्ये ,हरिदास उपाध्ये यांनी केले.त्यानंतर धार्मिक विधी मंत्रोउपचार आरती करुन महा नैवेद्य दाखविन्यात आला. दरम्यान रविवारी पहाटे 4 वाजता दख्खनच्या राजाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.त्यानंतर जोतिबादेवाची पाद्य पुजा व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8 वाजता जोतिबासह सर्व देवांना महाअभिषेक,महापोशाख व सूवर्णालंकारीत आकर्षक महापूजा बांधण्यात आली.त्यानंतर धुपारती करुन महानैवेध्य दाखविन्यात आला.
सायंकाळी सात वाजता धूप आरती सोहळा सुरू करण्यात आला, तो रात्री नऊ वाजेपर्यंत चालू होता, यावेळी श्रीचे पुजारी हुद्येवाले, देवसेवक, भक्तगण, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार, चोपदार, पूजारी, देवस्थान समिती व सिंधीया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे अधिकारी व कर्मचारी शाही पोशाखात तसेच मानकरी उपस्थितीत होते, त्यानंतर मंदिरात डवरी गीते, ढोली यांच्या ओव्या, व म्हालदार यांचा मानपानाचा सोहळा पार पडला. त्यानंतर धार्मिक विधी व मंत्रोपचार करण्यात आला. भाविकांच्या सेवेसाठी व धार्मिक विधीसाठी तसेच दर्शन रांगेवर नियंत्रन ठेवण्यासाठी देवस्थान समिती, पुजारी वर्ग, कोडोली पोलीस ठाण्याचे स.पो.नी.शीतल कुमार डोईजड कार्यरत होते.