गेल्या वर्षीपेक्षा 20 टक्के अधिकचे उद्दिष्ट; जिल्ह्यातील सात विदेशी मद्य कारखान्यांतून मिळणार मोठा महसूल
सांगली प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना अनेक मान्यताप्राप्त विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांचे मद्य निर्माण करणारी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राज्य उत्पादन विभागाला यातून मोठ्याप्रमाणात महसूल मिळणार आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयाला यावर्षी 459 कोटी ऊपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे उद्दिष्ट्यात 20 टक्के अधिकची वाढ करण्यात आली आहे.
जिह्यात दारूनिर्मितीमध्ये वसंतदादा कारखाना, राजारामबापू कारखाना, विराज, वायनरी तसेच अन्य कारखान्यातून मद्याची आणि अल्कोहोलची निर्मिती होते. देशी दारू निर्मितीत उत्पादन खर्चावर राज्यशासनाकडून 200 टक्के कर आकारला जातो. चार देशी दारूनिर्मिती कारखान्यातून जवळपास 100 कोटींवर कर मिळाला. दारू निर्मितीनंतर उत्पादन विभागाला परवाने नूतनीकरणातून महसूल जमा होतो. किरकोळ देशी दारूची- 220, विदेशी दारूची- 23, परमिट रूम व बीअरबार- 439, बीअर शॉपी- 62 अशी दुकाने आहेत. विदेशी दारू निर्मितीसाठी उत्पादन खर्चावर 300 टक्के कर आकारला जातो. यंदा प्रचलीत ब्रँडची दारू निर्मिती केली जाणार आहे. यासाठी महसुलात राज्य सरकारने 20 टक्क्यांची वाढ केली.
उत्पादन शुल्क विभाग सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्यांपैकी एक विभाग आहे. दारूनिर्मिती आणि परवाने नूतनीकरणातून कर मिळतो. सन 2021- 22 मध्ये 276 कोटींचे टार्गेट असताना 322 कोटी लाख महसूल गोळा झाला. टार्गेटपेक्षा 116 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. लॉकडाऊन परिस्थितीही महसूल उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. सन 2022-23 मध्ये 430 कोटींचे टार्गेट देण्यात आले होते. त्यामध्ये 379 कोटीचे उद्दिष्ट्या पुर्ण झाले आहे. एका कारखान्यांने आपल्या विदेशी मद्य निर्मिती नागपूरच्या एका कंपनीशी टायअप केल्याने हे टार्गेट पूर्ण झाले नाही. सध्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यावर्षात देलेले उदिष्ट्यो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे उद्दिष्ट दिले आहे
राज्यात उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी राज्यातून 22 हजार कोटी रूपये महसुली गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 459 कोटींचे उद्दिष्ट्या सांगली जिह्यास देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट्या पुर्ण करण्यासाठी जिल्हा उत्पादन विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी सांगितले.
जिल्ह्याला असणारे टार्गेट आणि पूर्तता
सन टार्गेट पूर्तता
2021-22 276 कोटी 322 कोटी
2022-23 430 कोटी 379 कोटी
2023-24 459 कोटी








