► वृत्तसंस्था / ब्लोमफाउंटन (द. आफ्रिका)
दक्षिण आफ्रेकेचा सलामीचा फलंदाज क्विन्टॉन डी कॉकने वनडे क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात डी कॉकने हा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे वनडे क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणारा डी कॉक हा सातवा फलंदाज ठरला आहे.
डी कॉकने शनिवारच्या सामन्यात 30 चेंडूत 45 धावा झोडपताना 2 षटकार आणि 6 चौकार मारले होते. वनडे क्रिकेटमध्ये डी कॉकने 17 शतके आणि 29 अर्धशतकांचा नोंदवली आहेत. दक्षिण आफ्रिकेतर्फे वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कॅलीसने 11550 धावा जमविल्या असून त्यामध्ये 17 शतके आणि 86 अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे वनडे क्रिकेटमध्ये धावा जमविणाऱ्या फलंदाजात डिव्हिलियर्स 9427 धावांसह दुसऱ्या, हाशिम आमला 8113 धावांसह तिसऱ्या, गिब्ज 8094 धावासह चौथ्या, ग्रिम स्मिथ 6989 धावांसह पाचव्या तर गॅरी कर्स्टन 6798 धावांसह सहाव्या स्थानावर आहे.









