नवी दिल्लीतील ‘जी20’ शिखर परिषदेत चर्चेच्या अंती जारी केलेल्या घोषणापत्रामध्ये रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या किंवा युद्धादरम्यानच्या क्रूर वर्तनाचा निषेधाचा उल्लेख वगळण्यात आला. त्याऐवजी युक्रेनियन लोकांच्या दु:खाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. बालीमध्ये एका वर्षापूर्वी मान्य केलेल्या घोषणापत्रापासून दूर जाण्याचा हा प्रकार राहिला. त्यावेळी नेत्यांनी आक्रमणाबद्दल भिन्न मते व्यक्त केली होती, तरीही त्यांनी रशियन आक्रमणाचा तीव्र निषेध केला होता आणि मॉस्कोला आपले सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते.
यावर्षी विभाजित ‘जी20’गट युक्रेनच्या मुद्यावर कोणत्याही प्रकारच्या सहमतीवर पोहोचेल याची अपेक्षा कमीच होती. या घोषणापत्रात संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धाचा निषेध करणाऱ्या मागील ठरावांकडे लक्ष वेधण्यात आले आहे आणि जगभरातील युद्धे आणि संघर्षांच्या प्रतिकूल परिणाम नमूद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निवेदनात रशियाला युक्रेनमधून धान्य आणि खतांच्या निर्यातीस परवानगी देण्याचे आणि एक व्यापक, न्याय्य व टिकाऊ शांतता प्रक्रियेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांच्या सल्लागारांनी नवीन घोषणापत्राने काय साध्य केले आहे त्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येते. त्यात जागतिक कर्जाच्या मुद्यावर आणि गरीब देशांवरील वाढत्या ताणांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेसारख्या संस्थांमध्ये बदल घडविण्याविषयी नवीन भाषा वापरण्यात आली आहे. ‘जी20’मध्ये सामील होण्यासाठी आफ्रिकन युनियनला आमंत्रण आणि असुरक्षित राष्ट्रांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार पेलण्याच्या दृष्टीने अधिक वित्तपुरवठा यांचा त्यात समावेश आहे. या घोषणापत्राने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेशाच्या दृष्टीने डिजिटल तंत्रज्ञानाची क्षमता देखील अधोरेखित केली आहे.
बायडेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या नेत्यांचा रशियाबद्दलचा नेहमीच्या पेक्षा मवाळ पवित्रा हा लक्षवेधी ठरला. बायडेन ‘जी20 शिखर परिषदेस’ आल्यावेळी युद्धाबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल जाहीरपणे बोलले नाहीत. जर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे नेते व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत शिखर परिषदेस हजेरी लावली असती, तर ते छान झाले असते इतकेच मतप्रदर्शन त्यांनी केले. जिनपिंग आणि पुतीन या दोन्ही नेत्यांनी या शिखर परिषदेत सहभागी होणे टाळले.
बायडेन यांनी शिखर परिषदेस आल्यावेळी आपला बहुतेक वेळ शांतपणे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडील संबंध वाढविण्यात घालविला. मागील काही राष्ट्राध्यक्षांप्रमाणे ते भारताला आणखी जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत यासंदर्भात विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. युक्रेनव्यतिरिक्त घोषणापत्रासंदर्भात वादाचे आणखी काही राहिले आहेत. पण 2026 मध्ये अमेरिका ‘जी20’ बैठकीचे आयोजन करणार असल्याची पुष्टी करणाऱ्या मसुद्यातील भाषेस चीनने आक्षेप घेतला असल्याच्या वृत्ताबद्दल जॅक सुलिव्हन यांना विचारण्यात आले असता, ‘चीनच्या मुद्यावर मी एवढेच म्हणू शकतो की, संभाषण झाले आहे, असे ते म्हणाले.









