द्विपक्षीय बैठकीचे फलित
? पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीतून घडलेली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भारत आणि अमेरिकेने ‘जागतिक व्यापार संघटने’शी संबंधित सातव्या आणि शेवटच्या प्रलंबित वादावर काढण्यात आलेला तोडगा. बायडेन आणि मोदी यांनी ‘जीई एअरोस्पेस’ व ‘हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड’ यांच्यातील व्यावसायिक कराराविषयीच्या चर्चेच्या अनुषंगाने अधिसूचना प्रक्रिया पूर्ण होण्याच्या घटनेचे स्वागत केले.
?पंतप्रधान मोदींच्या जूनमधील अमेरिका दौऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि व्यापक फलनिष्पत्तींची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत झालेल्या प्रगतीची प्रशंसा करण्यात आली. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानासाठी भारत-अमेरिकेने पुढाकार घेण्याचा यात समावेश आहे. त्याशिवाय संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, संशोधन, नवे उपक्रम, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला जी निरंतर गती मिळालेली आहे, त्याचेही याप्रसंगी स्वागत करण्यात आले.
?दोन्ही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांच्या हवामान, ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधन म्हणून अणुऊर्जेच्या महत्त्वाचा पुनऊच्चार केला. त्यांनी नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांत विस्तारित सहकार्याद्वारे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक सखोल आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचीही पुष्टी केली.
?मोदी आणि बायडेन यांनी अणुऊर्जेमध्ये भारत-अमेरिका सहयोगाच्या संधी वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या संबंधित संस्थांमधील वाढीव चर्चेचे स्वागत केले. यात सहयोगी पद्धतीने पुढील पिढीच्या छोट्या मॉड्युलर अणुभट्टीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचाही समावेश आहे.
?या बैठकीत अमेरिकेने ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’चे सदस्यत्व भारताला देण्यास आपल्या समर्थनाची पुष्टी केली आणि हे उद्दिष्ट पुढे नेण्याच्या दृष्टीने समविचारी भागीदारांसोबत प्रयत्न करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले.
?बायडेन यांनी यावेळी 31 ‘जनरल अॅटॉमिक्स एमक्यू-9बी’ (16 ‘स्काय गार्डियन’ आणि 15 ‘सी गार्डियन’) ही ‘रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट’ (ड्रोन) आणि त्यांच्याशी संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या विनंतीपत्राचेही स्वागत केले.
?दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंधांचे कौतुक केले आणि दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री जागतिक हिताला पुढे नेण्याच्या बाबतीत मोठी भूमिका बजावेल, असे मत व्यक्त केले. ‘आमची बैठक खूप फलदायी ठरली. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करू शकलो ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि लोकांचे संबंध वाढतील. आमची मैत्री जागतिक हित पुढे नेण्याच्या बाबतीत मोठी भूमिका बजावत राहील’, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.









