भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या फर्स्ट लेडी देखील सामील झाल्या. परिषदेच्या पहिल्या दिवशी विदेशी अतिथींसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शाही डिनरचे आयोजन केले होते. यावेळी विदेशी महिलांवर भारतीय पोशाखाची जादू दिसून आली. शाही रात्रीभोजनात पोहोचलेल्या विदेशी महिलांना भारतीय पेहरावात पाहिले गेले. काही महिलांनी साडी नेसली होती. तर काही महिला सूट-सलवारमध्ये दिसून आल्या.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या पत्नी कोबिता या साडीत दिसून आल्या. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी यूको यांनी हिरव्या अन् गुलाबी रंगाची साडी नेसून डिनरमध्ये भाग घेतला. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी भारतीय सूट-सलवार परिधान करून डिनरला उपस्थिती लावली. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या पत्नी रितु बंगा यांनी देखील यावेळी साडी नेसली होती. आयएमएफच्या पदाधिकारी गीता गोपीनाथ यांनी निळ्या अन् लाल रंगाची साडी नेसली होती. यादरम्यान त्यांना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत पाहिले गेले.









