पर्यटन खात्याची कंळगुटमध्ये कारवाई
पणजी : पर्यटन खात्याने अनुमती दिलेले शॅक भाड्याने दिल्यास आता ऊ. 10 लाखाची दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा खात्यातर्फे देण्यात आला आहे. सांवतावाडा-कळंगुट येथील रेमंड झिनो फर्नांडीस याला पर्यटन संचालक सुनिल अंचिपका यांनी तसा आदेश बजावला असून दंडाची रु. 10 लाखाची रक्कम 7 दिवसात भरण्यास बजावले आहे. यापुढेही शॅक भाड्याने दिल्यास कारवाई होणार असल्याचे पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे. त्याची सुरक्षा अनामत रक्कमही जात करावी असे आदेशात नमूद केले आहे. वर्ष 2019 ते 2022 या काळातील शॅक धोरणानुसार फर्नाडिस यांना शॅकची अनुमती देण्यात आली होती. नंतर ती 2023 पर्यंत वाढवण्यात आली. पर्यटन खात्याने केलेल्या चौकशीत फर्नाडीस यांनी जॉन लोबो यांना शॅक भाड्याने दिल्याचे समोर आले. लोबो यांना 2019-22 शॅक धोरणानुसार शॅक मिळाला नव्हता. लोबो यांनी पर्यटन खाते कर्मचारी वर्गावर आरोप केले व त्यामुळे ऊ 7 ते 8 लाखाचा तोटा झाल्याचे सांगितले. खात्याने केलेल्या चौकशीत लोबो यांना शॅक देण्यात आला नव्हता, असे दिसून आले आणि नंतर पर्यटन खात्याने त्यांची अधिक चौकशी केली. फर्नांडीस यांना खात्याने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.









