दुरुस्तीच्या कामामुळे वीजपुरवठा नाही : हेस्कॉम कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती
बेळगाव : नेहरुनगर येथील 110 केव्ही उपकेंद्र व सदाशिवनगर येथील 33 केव्ही वीजकेंद्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत शहर व उपनगरांतील काही भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवारी ही माहिती दिली आहे. इंडाल, इंडाल क्वॉर्टर्स, यमनापूर परिसर, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई इस्पितळाचा पाठीमागील परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, संगमेश्वरनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, शिवबसवनगर, गँगवाडी, केएबी क्वॉर्टर्स, डिमार्ट, जेएनएमसी, एस.जी.बी.आय.टी. रोड परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी, जुने पोलीस आयुक्त कार्यालय, सुभाषनगर डबल रोड, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टीव्ही सेंटर, पीअॅण्डटी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, नेहरुनगर, जिनाबकुल इंडस्ट्रीज एरिया, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड परिसरातही रविवारी वीजपुरवठा असणार नाही. सुभाषनगर, रामदेव हॉटेल परिसर, एसपी ऑफिस रोड, हनुमान हॉटेल, नेहरुनगर, केएलई रोड, एसपी ऑफिस, मनपा कार्यालय, मराठा मंडळ, विश्वेश्वरय्या नगर, हनुमाननगर, रेलनगर, सदाशिवनगर, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्स, डी. सी. बंगला, जाधवनगर, हनुमाननगर डबल रोड, क्लब रोड, हेस्कॉम व केपीटीसीएल कार्यालय व क्वॉर्टर्स, केएलई एचटी प्रकल्प, हनुमाननगर स्टेज 1 व 2, कुमारस्वामी लेआऊट, पोलीस कॉलनी, इरिगेशन कॉलनी, सारथीनगर, हनुमाननगर स्टेज 4 व 5, कुवेंपूनगर, मॉडर्न को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), बॉक्साईट रोड, टीव्ही सेंटर, कुमारस्वामी लेआऊट, मुरलीधर कॉलनी, प्रेस कॉलनी, मुंगुरडेकर कॉलनी, सह्याद्रीनगर व पाणीपुरवठा प्रकल्पावरील वीजपुरवठाही रविवारी खंडित राहणार आहे.
कणबर्गी, ऑटोनगर परिसरात उद्या दुरुस्तीचे काम
110 केव्ही कणबर्गी उपकेंद्र, श्रीनगर उपकेंद्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत कणबर्गी व ऑटोनगर परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. केआयएडीबी, ऑटोनगर इंडस्ट्रीज एरिया, केएसआयडीबी इंडस्ट्रीज एरिया, सिद्धेश्वर फौंड्रीज, टाटा पॉवर, बरफवाला, आशियान इंडस्ट्रीयल, केआयएडीबी एक्झीबेशन सेंटर, केएसआरटीसी डेपो, प्रदूषण नियंत्रण मंडळ, यादव इंडस्ट्रीज, केआयएडीबी ऑटोनगर इंडस्ट्रीज एरिया, कणबर्गी, केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी, साई कॉलनी, सागरनगर, रामतीर्थनगर, गणेश सर्कलपासून प्रतीक्षा हॉटेलपर्यंत व स्टेट बँक ऑफ म्हैसूर परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शिवालय समोर व पाठीमागील भाग, श्रुती लेआऊट, सुरभी हॉटेल परिसर, आश्रय कॉलनी परिसर, कुलकर्णी लेआऊट, सेक्टर क्रमांक 8 व 9 परिसर, चन्नम्मा सोसायटी श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर सेक्टर क्रमांक 8, 9, 10, 11 व 12, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ परिसर, शिवबसवनगर, एसबीआयपासून धर्मनाथ भवनपर्यंत, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल, विराभद्रनगर परिसर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, मेटगुड हॉस्पिटल, चन्नम्मासर्कल, कॉलेज रोड, काकतीवेस रोड, क्लब रोड, डीसी ऑफिस, कोर्ट कंपाऊंड परिसरात वीजपुरवठा ठप्प असणार आहे.









