कुडाळ / प्रतिनिधी
कलेश्वर विद्यालय नेरुर येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. सदर नाट्योत्सवात एस. एल.देसाई विद्यालय पाटची ‘श्रीअन्न- एक संतुलित आहार’ही वैज्ञानिक नाटिका प्रथम आली.’ भरड धान्याच्या वापरासाठी शासनामार्फत विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून मुलांमध्ये भरड धान्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून शासनामार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी विशेष करून भरड धान्याचा प्रचार व प्रसार व्हावा असा उद्देश या नाटिकेसाठी देण्यात आला होता.
या नाटिकेचे लेखन श्री आर. एन . ठाकूर व जान्हवी पडते यांनी केले.नेपथ्य श्री विनायक कांबळे यांनी केले. वेशभूषा व रंगभूषा श्री संदीप साळसकर व सौ .सिद्धी चव्हाण यांनी केली. नाट्योत्सवात एकूण सात शाळा सहभागी झाल्या होत्या यामधून सदर नाटिकेची निवड जिल्हास्तरावर झाली आहे.
नाटिकेत खालील विद्यार्थी सहभागी होते. कुमार ओम सामंत, विनायक वेंगुर्लेकर, गौरांग गोसावी, यश मांजरेकर, साई वेंगुर्लेकर, रामदास मोरये, हर्षदा सावंत, चिन्मयी कोरगावकर, नृतिका राणे, आर्या चांदेकर व सृष्टी खोत या यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन श्री देवदत्त साळगावकर श्री राजेश सामंत आणि सर्व संस्था संचालक,मुख्याध्यापक श्री शामराव कोरे व पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर यांनी केले.









