नवी दिल्ली
दुचाकी निर्माता जावा मोटरसायकलने 42 बॉबर बाइकची ‘ब्लॅक मिरर’ आवृत्ती लॉन्च केली आहे. जावा बॉबर मॉडेलच्या फॅक्टरी-कस्टम लाइनअपमधील हा टॉप-एंड प्रकार आहे.
बॉबर जॅस्पर रेड ड्युअल टोन, मूनस्टोन व्हाइट आणि मिस्टिक कॉपर या रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. कॉस्मेटिक अपडेट्स व्यतिरिक्त, जावाने बाईकमध्ये किरकोळ बदल केले आहेत आणि काळ्या आणि सिल्व्हर फिनिशसह ड्युअल-टोन अलॉय व्हील्स दिली आहेत. यामध्ये ट्यूबलेस टायर्सचा समावेश आहे. गियर आणि इंजिन कव्हर्सनाही नवीन डिझाइन देण्यात आले आहे. कंपनीने जावा 42 बॉबर ब्लॅक मिररची किंमत ही 2,25,187 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) ठेवली आहे. बाईकचे बुकिंग सुरु झाले आहे, लवकरच डिलिव्हरी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भारतीय बाजारपेठेत नुकत्याच लाँच झालेल्या रॉयल एनफील्ड बुलेट 350 शी या गाडीची स्पर्धा राहणार असल्याची माहिती आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. यात स्लिप आणि असिस्ट क्लचचीही सुविधा आहे.