न्हावेली / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सिंधुदुर्ग आयोजित विद्याविहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय,आरोस येथे शुक्रवार ८ रोजी सकाळी ११.वाजता सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक श्री.चंद्रशेखर ठाकूर हे टिव्ही कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,विभाग अध्यक्ष मंदार नाईक,नंदू परब,संदेश सावंत,नीलेश देसाई,प्रविण आरोसकर,सुनिल नाईक,मुकुंद धारगळकर,स्वप्निल जाधव,ज्ञानेश्वर नाईक,आदी उपस्थित राहणार आहेत.या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.









